Home महाराष्ट्र हे धक्कादायक आहे, जिवंतपणी उपचार नाही अन्…; रोहित पवारांची योगी सरकारवर टीका

हे धक्कादायक आहे, जिवंतपणी उपचार नाही अन्…; रोहित पवारांची योगी सरकारवर टीका

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गंगा नदीच्या किनारी मोठ्या संख्येने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मृतदेह वाळूमध्ये पुरून गंगा नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे मृतदेहांची विटंबना होण्याचे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

हे धक्कादायक आहे, जिवंतपणी उपचार नाही अन मृत्यूनंतरही अवहेलनाचं!, “कोविडमुळं मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचे मार्गदर्शक तत्त्व उत्तर प्रदेशात अक्षरशः गंगेला मिळाल्याचं दिसतंय. यामुळं आपण करोना रोखतोय की पसरवतोय असा प्रश्न पडतो. शिवाय मृतदेहांची होणारी विटंबना वेगळीच! काय बोलावं? असं रोहित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकार शिवसेना भवनावरून करिना, कतरिनाला पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”

“राज्यात 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

“महाराष्ट्र मॉडेल…महाविकास आघाडीच्या आमदारावर जर दिवसाढवळ्या गोळीबार होत असेल तर…”

केंद्रावर खापर फोडण्याची राज्य सरकारची खेळीदेखील न्यायालयात उघडकीस आली- केशव उपाध्ये