“टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड”

0
151

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.  मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतानाचल विरोधी पक्षावर निशाणा साधलाय.

दरम्यान, स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत. त्यास सलाम!, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत- प्रवीण दरेकर

“मोदी सरकारने महाराष्ट्राला किती मदत केली हे फडणवीसांनी सांगायला हवं”

उद्धव ठाकरेजी थोडा अभ्यास करत जा; चंद्रकांत पाटलांचा टोला

“मोठी बातमी! शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here