मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रातील प्रमाण वाढले असतानाच, दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात आज पहाटे आग लागली. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात अग्नितांडव सुरूच. काल पुन्हा एकदा मुंब्रा येथे प्राईम रुग्णालयाला मध्यरात्री 3च्या सुमारास आग लागून त्यात 3 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. रुग्णालयांना आगी लागताहेत रुग्णांना प्राण गमवावे लागले… हे कोरोनाचे कमी आणि व्यवस्थेचे बळी जास्त आहेत भावपुर्ण श्रद्धांजली, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे.
महाराष्ट्रात अग्नितांडव सुरूच…
काल पुन्हा एकदा मुंब्रा येथे प्राईम रुग्णालयाला मध्यरात्री ३च्या सुमारास आग लागून त्यात ३ रूग्णांचा होरपळून मृत्यू
रुग्णालयांना आगी लागताहेत रुग्णांना प्राण गमवावे लागले…
हे कोरोनाचे कमी आणि व्यवस्थेचे बळी जास्त आहेत
भावपुर्ण श्रद्धांजली…..— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 28, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, आता दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणंच चालावं लागेल”
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन”
ठाण्याच्या मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग, 4 रूग्णांचा मृत्यू
माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी माझं आयुष्य दयनीय बनवलं- कंगणा रणाैत