“आता स्टीव्ह स्मिथ नव्हे, तर ‘हा’ असेल राजस्थान राॅयल्सचा नवा कर्णधार”

0
246

मुंबई : आयपीएलची फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सने संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिलीज केलं आहे. तो आयपीएल 2021 मध्ये संघाकडून खेळताना दिसणार नाही. राजस्थानच्या फ्रेंचायझीकडून असे सांगितले जात आहे की, संघाचा कर्णधार म्हणून संजू सॅमसनची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता स्टीव्ह स्मिथच्या जागी संजू सैमसन संघाचं कर्णधारपद सांभाळणार असून कुमार संगकाराला संघाचा नवा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्टीव्ह स्मिथसह वरुण अॅरोन, अंकित राजपूत, टॉम कुरेन यांना देखील संघाबाहेर करण्यात आलं आहे.

स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानने आयपीएल 2020 मध्ये 14 लीग सामने खेळले त्यापैकी 6 सामने जिंकले आणि 8 सामन्यात पराभव झाला. गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानी होते.

दरम्यान स्टीव्ह स्मिथने गतवर्षीत्या मोसमात 14 सामन्यांत केवळ 311 धावा केल्या. ज्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याची सर्वोत्तम धावसंख्या 69 होती आणि त्याचा स्ट्राइक रेट 131.22 होता.

महत्वाच्या घडामोडी-

आता नारायण राणेंना सुखानं झोप लागेल- शरद पवार

“सरकार पाडण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न, पण…”

“नाशिक महापालिकेच्या इमारतीला आग”

आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं, त्यात गैर काय?- सुप्रिया सुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here