आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण ऐनवेळी शिवसेना फिरली. शिवसेनेने हिंदूत्वाशी तडजोड केली, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात 2019 साली विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी मी इथं आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण ऐनवेळी शिवसेना फिरली. शिवसेनेने हिंदूत्वाशी तडजोड केली, असं अमित शहा म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हरवलंय,शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ”
दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही. तुमच्या उपस्थित मी आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या होत्या आणि आपण निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. सगळं काही ठरलं असलं तरी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला आणि त्यांच्यासह सत्तेत बसले, अशी टीकाही अमित शहा यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
अमित शहांच्या मदतीसाठी अजित पवार धावून आले, यावर रूपाली पाटील यांची प्रतिक्रिया म्हणाल्या…
देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा; पंकजा मुंडेंनी उधळली स्तुतीसुमने
अखेर ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी, म्हणाले…