मुंबई : शरद पवारांमुळेच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री पदावर असताना एका चांगल्या कार्याची सुरूवात माझ्या हस्ते होईल असं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. आज भूमिपूजन केले, 36 महिन्याने आपण सगळे एकत्र चाव्या देऊ. आयुष्य काही-काही क्षण अनपेक्षितपणे येत असतात. मुख्यमंत्रिपद स्वप्नात नव्हते. आता त्याच्या खोलात जात नाही, शरद पवारांमुळेच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, लहानपणापासून या परिसरात माझे येणे-जाणे आहे. शिवसेना प्रमुखांसोबत यायचो. आज भूमिपूजनानिमित्त माझ्यावर इथल्या लोकांनी पुष्पवृष्टी केली. पण आम्ही लोकांच्या ऋणात आहोत. मुंबईने, मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. स्वतःची हक्काची घरं झाल्यावर मोहाला बळी पडू नका, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागली”
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्याच काळातलं; देवेंद्र फडणवीसांचा दावा
दादा…….क्या हुवा तेरा वादा; चित्रा वाघ यांचा अजित पवारांना टोला
“मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रमुख पदावर आहेत, त्यामुळे त्यांनी थप्पडबाजीची भाषा वापरणं दुर्दैवी”