Home महाराष्ट्र संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; अजित पवारांचा राणेंना टोला

संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; अजित पवारांचा राणेंना टोला

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

बॅक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते. संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही. सतीश सावंत ज्यांच्या नेतृत्वाखाली बॅकेत काम करत होते ते काय काय काम सांगत होते, हे सर्वांनाच माहिती आहे,असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिर्घायुष्यासाठी पायी बालाजीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू “

आपल्या विरोधकांचे राजकीय पाठबळ कसे आहे ते पाहा. कोणाच्याही दबावात येऊ नका. तसेच दादागिरी दहशतीला घाबरू नका, बँकेला उंच स्तरावर नेणाऱ्या व्यक्तींनाच निवडून आणा. कर्ज कसे थकवले हे सभासदांनी बघावे. बँकेत चुकीचे वागून चालणार नाही. प्रतिभावान व्यक्तीच्या हातातच बॅक द्या. अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीडसारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेचीही होईल, असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री उदय सामंत हेही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची जीभ घसरली; म्हणाले…

…म्हणून मी भाजप नेत्या मनेका गांधी यांची भेट घेतली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण

“ग्रामीण भागातही राज ठाकरेंची क्रेझ; अनेक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”