Home महाराष्ट्र शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो, आम्हांला मागायला हवा होता, आमच्याकडे भरपूर आहेत- नारायण राणे

शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो, आम्हांला मागायला हवा होता, आमच्याकडे भरपूर आहेत- नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाले. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. यावरून नारायण राणेंनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीका केली आहे.

शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो. शिवसेनेकडे आहेत कुठे? आमच्याकडे मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत, असा टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला. राणेंनी पत्रकार परिषद घेऊन हा टोला लगावला.

ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचं मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असं म्हटलं पण आम्ही गेलो तेंव्हा तिथे कुणीच नव्हतं. मी जर त्यांचा पुत्र असतो तर येऊच दिलं नसतं., असा हल्लाबोल राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

आम्ही निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असता तर तेच गोमूत्र…; निलेश राणेंचा हल्लाबोल

“आमदार गोपीचंद पडळकरांनी करून दाखविलं, पोलिसांना गुंगारा देत अखेर बैलगाडी शर्यत संपन्न”

अडवण्याची भाषा करणाऱ्यांनी पुढच्या वेळी चड्डीत राहायचं; नितेश राणेंचा घणाघात

शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण; नारायण राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…