मोदींवर टीका करणारं ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट

0
164

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलं होतं. हे ट्विट भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांनी रिट्विट केलं. ते रिट्विट खडसेंनी डिलीट केलं आहे.

भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट केल्यामुळे आता ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर संकेत दिलं असल्याच्या चर्चा रंगल्या. यानंतर खडसे यांनी आपल्या अकाऊंटवरुन हे रिट्विट डिलीट करुन टाकले. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या मनात नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं- जयंत पाटील

निकोलस पूरन-ग्लेन मैक्सवेलची शानदार फलंदाजी; पंजाबची दिल्लीवर 5 विकेट्सनी मात

दुर्गा अष्टमीपर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन अटळ; पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा

पंतप्रधानांनी देश विकायला काढलाय ; प्रकाश आंबेडकरांची नरेंद्र मोदींवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here