चिपळूण : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्येही बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी चिपळूणवरील परिस्थितीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज्यात संकट येत आहेत त्याला मुख्यमंत्र्यांचा पायगुण कारणीभूत आहे. ते आल्यापासून वादळ काय, पाऊस काय, कोरोना काय सर्व चालू आहे. कोरोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे आहेत का, असा टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला.
दरम्यान, पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. लोकं 4 दिवसांपासून जाब विचारत होते. मात्र आधी काही कल्पना दिली नाही, तसेच धोका लक्षात घेऊन लोकांना स्थलांतरित करायला हवं होतं, या सर्वांना हे सरकार जबाबदार आहे, अशी टीका नारायण राणेंनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात संरक्षण भिंत उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
“मत मागायला याल, तेंव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”
ओबीसींबद्दल केंद्राला राग, समाजाचे नुकसान करण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र