विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे- संजय राऊत

0
172

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ कार अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूल असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, मनसुख हिरेन यांचा मृत्यू धक्कादायक आहे. मात्र, विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?; चित्रा वाघ यांचा सवाल

“मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण”

धक्कादायक! मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू

“धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here