आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या दारू पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधानावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “गानकोकिळा लता मंगेशकरांची प्रकृती चिंताजनक, राज ठाकरे यांनी तातडीनं रूग्णालयात घेतली धाव”
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. दारूच्या नशेत बंडाचा केंव्हा सय्यद बंडा झाला कळलेच नाही., असं ट्विट करत अमोल मिटकरी यांनी बंडातात्यांना उपरोधक टोला लगावला आहे.
दारूच्या नशेत बंडाचा केंव्हा सय्यद बंडा झाला कळलेच नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 4, 2022
दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील याही आक्रमक झाल्या असून त्यांनी या प्रकरणी रात्री उशिरा पुणे येथे गुन्हा दाखल केला आहे. रूपाली पाटील यांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे. इथं न्याय होणार, सुप्रिया ताई सुळे आणि पंकजा ताई यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल बंडा कराडकर यांच्या विरुद्ध रात्री उशीरा पुणे येथे गुन्हा दाखल केला. लवकरच त्यांना नोटीस मिळेल. हि महिलांच्या आत्मसन्मानाची लढाई #बंडाविरुद्धबंड होणार, असं रूपाली पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
किरीट सोमय्यांना ठार मारण्याचाच हेतू होता; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
नागपूरात महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?
अमृता फडणवीसांच्या ‘ट्रॅफिकमुळे घटस्फोट’ विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…