आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला होता.
हे ही वाचा : तरूणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरूणाची झाली चांगलीच फजिती; पहा व्हिडिओ
यूपीए अस्तित्वात नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. एखाद्याने काहीच करायचं नाही आणि केवळ परदेशात राहायचं, अशाने काम कसं चालेल? असा सवाल त्यांनी केला होता. यावरून आता काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
ममता बॅनर्जींनी स्वतः मोदींसोबत सहकारी म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे पुन्हा कधी त्या रंग बदलतील, पुन्हा मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही. आज काँग्रेसच एक असा पक्ष आहे, जो सतत आणि सलग या जातीयवादी पक्षांच्या विरोधात उभा राहिलेला आहे, असा पलटवार पृथ्वीराज चव्हाणांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
जो डर गया, वो मर गया; नवाब मलिकांचा प्रवीण दरेकरांना टोला
“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?”
राष्ट्रवादीला हिसका दाखवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचा स्वबळाचा नारा