आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या वेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला. यावेळी राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण न वाचता अचानक भाषण संपवलं. यावरून महाराष्ट्र काँग्रेसने राज्यपालांवर टीका केली आहे.
हे ही वाचा : “सांगलीत राष्ट्रवादीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”
“काय ते हातवारे, काय ते हसणं… सारचं किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव,” असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यपालांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा ट्विटरवरुन निषेध करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पण आता ते आमच्यावर फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
राज्य सरकारची अनलाॅकबाबत नवी नियमावली; सांगलीसह ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता”
“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, राहुरीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”