Home महाराष्ट्र देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा- नाना पटोले

देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा- नाना पटोले

मुंबई : मोदी सरकारला केंद्रामध्ये सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण झाले आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर टीका केली आहे.

आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजप सरकारची दुटप्पी भूमिका आहे, असं म्हणत देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा आहे, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी यावेळी केला. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.

कोरोनावर वेळीच उपचार झाले असते तर अनेकांचे जीव गेले नसते. पण मोदी सरकारने टाळ्या-थाळ्या वाजवून देशावासियांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटलं. मग आता सत्कार करताय?, असा प्रश्न करत सुटाबुटाचं सरकार म्हटल्यावर भाजपला त्रास झाला. पण पंचतारांकीत हॉटेलमध्ये लसीकरणाची भूमिका भाजपची आहे. गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं असं मोदी सरकारला वाटतंय, असं टीकास्त्र नाना पटोलेंनी सोडलं.

महत्वाच्या घडामोडी –

खंडणी आणि वसूली हाच शिवसेनेचा धंदा; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“जळगावमध्ये भाजपला धक्के सुरूच; आणखी 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

“विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळं निधन”

“अजित पवार सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा, मी बोलायला लागलो तर महागात पडेल”