मुंबई : मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
हे काही नवीन नाही. मंदिर बंद ठेवून, बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे. त्यामुळे त्यात काहीच नवीन नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी यावेळी लगावला. सदाभाऊ खोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, यावेळी बोलताना सदाभाऊ खोतांनी धनगर आरक्षणावरही भाष्य केलं. 15 वर्ष सत्ता असताना ज्यांनी धनगर आरक्षण दिलं नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर उगाच टीका करू नये. फडणवीसांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या होत्या. त्यामुळे आता या सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, असा सल्ला सदाभाऊ खोतांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्र लवकरच ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारं पहिलं राज्य ठरणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
“प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन”
“IPL 21 च्या उर्वरित सामन्यांच्या नियमांमध्ये बदल, BCCI कडून नवी नियमावली जारी”