आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंजाबमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षात राहणार नसल्याचंही स्पष्ट केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? असा सवाल करतानाच जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच. गांधी परिवार आहे. पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तर तो दूर करायला हवा. एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय? असाही सवाल सामनात केला.
पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपालाही जिंकता येत नाही आणि भाजपलाही काँग्रेसचे टॉनिक लागते. हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?, असंही सामनात म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
ऋतुराज-डू प्लेसिसची शानदार खेळी; हैदाराबादवर 6 विकेट्सनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवलं स्थान
नारायण राणे यांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…
राज ठाकरेंच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल; कार्यालयाने दिलं ‘हे’ उत्तर
भाजप-मनसे संभाव्य युतीवर नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले…