मुंबई : नेत्यांनी पूरस्थिती असलेल्या भागात पर्यटन टाळावे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रात एक सरकार आहे. मुख्यमंत्री आहेच आहे व ही व्यवस्था लोकशाही तसेच घटनात्मक मार्गाने सत्तेवर आली आहे”, हे कुणीच नाकबूल करणार नाही. पण याचही विस्मरण होऊ देता कामा नये की, राज्याचं विधीमंडळ, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते हे देखील याच लोकशाही व्यवस्थेचे अविभाज्य भाग आहेत आणि तेही धटनात्मक मार्गानेच त्या पदावर आहेत, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
घटनास्थळी जाऊन लोकांना धीर देणं, सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रितपणे या संकटाशी मुकाबला करीत आहेत. हा विश्वास निर्माण करणं, प्रशासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेणं आणि त्रुटी सरकारच्या निदर्शनास आणून देणं, हे विरोधी पक्ष नेते पदाच्या कर्तव्याचा एक भाग आहे, त्याला पर्यटन संबोधून लोकशाहीची थट्टा करणे योग्य नाही, असंही प्रविण दरेकर यांनी मह्टलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
जनतेच्या आक्रोशामुळे शिवसेना हादरुन गेली, त्यामुळेच…; नारायण राणेंचा हल्लाबोल
शरद पवार म्हणाले दौरे टाळा; अतुल भातखळकर, म्हणतात…
“अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, आजचा दुसरा टी-20 सामना रद्द”