कुठलंही काम शिल्लक ठेवणं, हे आमच्या रक्तात नाही- विश्वजीत कदम

0
979

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली :  सांगली जिल्ह्यातील एक श्रद्धेचं स्थान असणारं ब्रम्हानंद महाराज मठ बुरूंगवाडी, ता.पलूस येथील ब्रम्हानंद महाराजांच्या मठातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमास अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. काँग्रेस नेते व राज्यमंत्री डाॅ.विश्वजित कदम हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सर्व माता भगिनी, ग्रामस्थ तसेच बुरूंगवाडी महाराज मठावर श्रद्धास्थान असणाऱ्या सर्व माता भगिनी, तसेच या परिसरातील ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या बंधू-भगिनींनो आज आपण एक भावनिक आणि महत्त्वाच्या सोहळ्यासाठी जमलो आहोत. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या बुरूंगवाडी गावातील ग्रामस्थांचंच नव्हे, तर या पलुस तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील एक श्रद्धेचं स्थान असणारं ब्रम्हानंद महाराजांच्या मठातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमास आज आपण जमलेलो आहोत.

गावातील कार्यकर्त्यांची, ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षापासूनची तळमळीची इच्छा होती. की ज्या ब्रम्हानंद महाराजांच्या समोर संपूर्ण जिल्हा नतमस्तक होतो, आपल्या परिसरातील गोरगरीबांची, सर्वसामान्य लोकांची एक मोठी श्रद्धा आपल्या सर्वांची आहे, त्यांचं एक चांगलं मंदीर व्हावं आणि त्याची मूर्ती इशं लवकरात लवकर बसवून मिळावी, गावातील काही ट्रस्टीज, ग्रामस्थ वर्षभरापासून मला भेटत होते. मी त्यांना शब्द दिलेला होती की, ज्या ठिकाणी माझे वडील स्व.आदरणीय पतंगरावजी कदम साहेब श्रद्धेनं इथं येऊन आशिर्वाद घ्यायचे आणि जिथे संपूर्ण तालुक्याची श्रद्धा आहे, अशा ठिकाणी आपल्या गावात एक भव्य आणि सुंदर असं या जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील मंदीर आपण बनवूया, असं विश्वजित कदम यांनी यावेळी म्हटलं.

हे ही वाचा : किरीट सोमय्या प्रकरणावरून खासदार रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाल्या…

दरम्यान, आम्ही आमच्या पद्धतीनं 10 लाख रूपये मंदीरातील ट्रस्टीजकडे सूपूर्द केले आहेत. मला एकचं सांगायचंय की, आदरणीय पतंगराव कदम साहेबांच्या विचारांचा वारसा समोर घेऊन या मतदार संघात काम करतोय. मी पहात होतो की, अजूनही या मंदिराचं काही काम शिल्लक आहे. पण कुठलीही काम शिल्लक ठेवणं, हे आमच्या रक्तात नाही. ते काम पूर्ण केलं जाईल, हा तुम्हांला आज मी शब्द देतो, असं विश्वजीत कदम म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना-राष्ट्रवादीला मनसे दणका देणार; राज ठाकरेंकडे मागितली आघाडीची परवानगी”

‘बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं आसावं; …या गोष्टीमुळे मोदीही सुप्रिया-पवारांकडे बघत राहिले

देवेंद्र फडणवीसांनी दिली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना लिफ्ट; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here