आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये 1 मे रोजी सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केली आहे. अशातच सभेला प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
हे ही वाचा : “भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले, तर मी माझे हात कलम करून घ्यायलाही तयार “
देशाच्या राजधानीत दिल्लीत एक प्रकारचे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असले तरी कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे. दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडवण्याचे काम झाले आहे. आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील जनता ज्याप्रकारे सर्वधर्मसमभाव मानते त्यामध्ये हिंदू असो की मुसलमान, ख्रिश्चन असो या सर्वांनी आपापसातील बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे,असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स; ‘या’ दिवशी होणार चौकशी
“राष्ट्रवादीचा भाजपला दणका; हर्षवर्धन पाटलांच्या कट्टर समर्थकानं हाती बांधलं घड्याळ”
स्वत:वर हल्ला झाला म्हणून, काही लोक ओठाखाली साॅस लावून फिरतात आणि…; संजय राऊतांचा सोमय्यांना टोला