“जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…”

0
336

मुंबई : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यंदा देखील राज्यभरातील वारकऱ्यांना आषाढी एकादशी निमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता आलेले नाही. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज उद्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरकडे रवाना झाले. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

“जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम…एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला… वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…” असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

दरम्यान, या ट्विटमध्ये केशव उपाध्ये यांनी पावसामुळे मुंबई जलमय झाल्यावरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, पुण्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत न झाल्याने स्वप्निल लोणकर या तरूणाने केलेल्या आत्महत्येवरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी, महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही”

सरकारच्या नाकर्तेपणामुळे राजकीय आरक्षण रद्द झालं- देवेंद्र फडणवीस

“केवळ याच जन्मात नाही, तर पुढच्या जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील”

“काँग्रेसचा मोठा निर्णय! काँग्रेस अध्यक्षपदी म्हणून माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांची नियुक्ती”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here