मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांना निवेदन देत सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
फडणवीसजी, आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रावरुन फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला होता त्यावर रोहित पवारांनी प्रत्यृत्तर दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
करोनाग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जेवणात घोटाळा- किरीट सोमय्या
…अन्यथा आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
… तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात; बाळासाहेब थोरातांच भाजपवर टीकास्त्र
तुम्ही जर मुख्यमंत्री असता, तर आमच्यावर ही वेळच आलीच नसती; पोलिसाने फडणवीसांसमोर मांडली व्यथा