ठाकरे सरकारकडून कौतुक करावं असं काम झालेलं नाही- पंकजा मुंडे

0
724

बीड : नव्या सरकारकडून कौतुक करावं असं काम झालेलं नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर  निशाणा साधला आहे. त्या बीडमधल्या भाजप कार्यलयात बोलत होत्या.

ठाकरे सरकारकडून काही चांगलं काम होत असेल तर त्यांचं कौतुक नक्की करु, पण वाईट काम करणार असाल तर सरकारला सरळ करण्याची ताकद भाजपमध्ये आहे, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.

गेल्या पाच वर्षात मी चांगलं काम केलं. अहोरात जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला.मंत्री म्हणून सत्कार स्विकारत फिरले नाही. अभ्यास चांगला केला पण गुण देणं जनतेच्या हातात होतं, असंही पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवं सरकार जलयुक्त शिवार, जलसंजाल, जनतेमधून थेट सरपंच निवड, अशा योजना, निर्णयांवर बंदी आणण्याच्या कामातच व्यस्त आहे,  असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकार येत्या 11 दिवसांत कोसळेल; नारायण राणेंच भाकित

‘या’ दोन गोष्टींसाठी देवेंद्र फडणवीसांनी केलं मुख्यमंत्र्यांच अभिनंदन

पीएचडी करण्यासाठी मी विद्यार्थी म्हणून 10-12 वर्ष अभ्यास करण्यास तयार- चंद्रकांत पाटील

सरकारमधील पक्षांमध्ये आपापसांतच सुसंवाद नाही- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here