मुंबई : बिहारच्या निवडणुकीत भाजपप्रणीत ‘एनडीए’ला 125 जागांवर विजय मिळाला. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. यातून बोध घेऊन नितीश कुमार हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत. त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिली, असंही रोहित पवार म्हणाले.
यातून बोध घेऊन @NitishKumar जी हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन; निलेश राणेंचा टोला
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन; निलेश राणेंचा टोला
बिहारमध्ये अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित ‘एनडीए’चा विजय; पंतप्रधान मोदींनी ट्विट करत मानले जनतेचं आभार
मुंबई इंडियन्स पाचव्यांदा चॅम्पियन; फायनलमध्ये दिल्लीचा 5 विकेट्सने पराभव