Home देश “एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, अथवा शंभर काय मोदींना काहीच फरक पडत...

“एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, अथवा शंभर काय मोदींना काहीच फरक पडत नाही”

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.

मोदी हे देशातील शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत आणि वारंवार चर्चा करुन ते शेतकऱ्यांना थकवू पाहत आहेत. शेतकऱ्यांना हे लक्षात यायला हवं की वेळकाढूपणा केला जात आहे आणि त्यांना थकवले जात आहे. असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, दोन काय अथवा शंभर काय मोदी यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना असं वाटतं की, शेतकरी थकून जाईल आणि पळून जाईल. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावं की, शेतकरी पळून जाणारा नाही. आपल्याला पळून जावं लागंल. आज शेतकरी, उद्या मध्यमवर्गीयांचा नंबर, असंही राहूल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी जंतर-मंतर येथे जाऊन पंजाबमधील जे गत 40 दिवसांपासून कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत आहेत. त्या संसद सदस्यांप्रती एकजूटता प्रकट केली. त्यावेळी राहूल गांधी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडे यांनी माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ घेतले आहेत; रेणू शर्माचा मोठा खुलासा

उत्तर प्रदेश हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 महिने रूममध्ये कोंडून अत्याचार

धनंजय मुंडे प्रकरणावरून मला धमकीचे फोन येत आहेत- किरीट सोमय्या

“धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घेऊ नका, त्यांना संरक्षण द्या”