भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस नाही का?- प्रियांका चतुर्वेदी

0
173

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचं आश्वासन दिलं आहे. यावरुन शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ, असं आश्वासन देण्यात आलं आहे. याचा अर्थ भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही का, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणे, हे आमचे प्रमुख आश्वासन असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लक्षणं; होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय

अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, आणि…- एकनाथ खडसे

“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे”

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- एकनाथ खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here