पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पुण्यासह राज्यातील महिलांच्या कोविड सेंटरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
राज्यामध्ये महिला रूग्ण ज्या दाखल झाल्यात कोव्हिड 19 आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये किती बेजबाबदारणे हाकलंलं जातंय हे याचं उदाहरण आहे. आणि ही पुण्यातील पहिली घटना नाही, पुण्यातील तिसरी घटना आहे. याच्यामध्ये जवळपास राज्यभरामध्ये 12 विनयभंगाच्या आणि 2 बलात्काराच्या केसेस झाल्या आहेत. गेल्या 4 महिन्यापासून आम्ही सरकारला दोषा लावलाय की तुम्ही या रूग्णांसाठी SOP जाहीर करा त्यांच्या सुरक्षेसाठी परंतु आज पर्यंत सरकारने ते काम काही केलेलं नाही आणि ज्या वेळेसा अशा घटना होतात त्यावेळेला फार दु:ख होतं मनातनं, संताप होतो की अजून किती दिवस आपण शांत या गोष्टी बघायच्या, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
वारंवार मागणी करून सुद्धा तेथे SOP जाहीर केलं जात नाही. 12 विनयभंगांच्या घटना घडल्या, 2 बलात्काराच्या घचना घडल्या, 1 स्वॅब टेस्टिंगची घटना घडली. पण अजून अशा किती घटना झाल्यानंतर सरकारला जाग येणार आहे. सगळ्यात प्रथम आम्ही बऱ्याच प्रकारच्या मागण्या केल्या, महत्वाची मागणी ही होती की, आरोपी पकडले जातील, त्यांच्यावर कारवाई होईल, अशा किती संस्था आहेत, ज्या संस्था हे चालवत्यात त्यांची ही जबाबदारी नाही का.? असं चित्रा वाघ यांनी केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणतात ‘माझं कुटूंब, माझी जबाबदारी’,मग राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटूंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का? पुण्यातील जम्बो कोविड केंद्रातून गायब झालेल्या लेकीसाठी तिची माय आर्त हाक देतेय. अशा कित्येकींचा आवाज ‘मातोश्री’पर्यंत कधी पोहोचणार? असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला केला आहे.
मुख्यमंत्री म्हणतात ‘माझं कुटूंब, माझी जबाबदारी’,मग राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटूंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का? पुण्यातील जम्बो कोविड केंद्रातून गायब झालेल्या लेकीसाठी तिची माय आर्त हाक देतेय. अशा कित्येकींचा आवाज ‘मातोश्री’पर्यंत कधी पोहोचणार? @CMOMaharashtra pic.twitter.com/vkk5gIaCWI
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 24, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“किंग्स इलेव्हन पंजाबचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”
अति तिथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आलाय; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका
के.एल. राहूलचे शतक; पंजाबचे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरसमाेर 207 धावांचे लक्ष्य
…अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील; रावसाहेब दानवेंचा सरकारला इशारा