सांगली : इस्लामपूरातील कोरोनाच्या 25 रुग्णांपैकी 4 जणं आता कोरोनामुक्त झाले आहेत. या चारही जणांच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यात ही सांगली जिल्ह्यासाठी समाधानकारक बाब आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार इतर 21 रुग्णांची प्रकृतीही सुधारत आहे. तेही यातून बाहेर येतील हा मला विश्वास आहे, अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील काही अपवाद वगळता लोकांनी लॉकडाऊनचे पालन अत्यंत चोखपणे केले, त्याबाबत मी जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानतो, असं म्हणत जयंत पाटील यांनी सांगलीकरांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, 14 एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईलच, मात्र जनतेने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नये. सांगलीत कोरोना आटोक्यात येत असला तरी इतर ठिकाणी आकडे वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. म्हणूनच प्रत्येकाने जबाबदारीने वागा. योग्य अंतर ठेवा, असंही जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का? राम कदमांचा सवाल
महाराष्ट्रात लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागणार- राजेश टोपे
जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं; अजित पवारांच जनतेला आवाहन
तेढ निर्माण करणारे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवू नका, नाहीतर…