मुंबई : राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडट्टीवार यांनी दिली तर काही वेळातच जनसंपर्क विभागाकडून निर्बंध शिथिल केल्याचा संदेश येत आहे. यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधलाय.
मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो, तसं काही नाही हो….हे सरकार आहे की सर्कस?, असं म्हणत अतुल भातखळकरांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.
मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो तसं काही नाही हो… हे सरकार आहे की सर्कस? @OfficeofUT pic.twitter.com/J6773JoEcj
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 3, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही; हसन मुश्रीफांचं प्रत्युत्तर
शरद पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच- चंद्रकांत पाटील
“गोपीनाथ मुंडे आज असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं”
शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही- गोपीचंद पडळकर