मुंबई : पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड घडलं. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावर विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय आणि घर राजभवनाच्या दारात आहे का?,” असा सवाल करत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
विरोधी पक्षाचं अधःपतन महाराष्ट्रात यापूर्वी कधी झालं नव्हतं. सध्या राज्यामध्ये देशामध्ये प्रसंग काय आहे? आणि तुम्ही राजकारण काय, कसलं करत आहात? तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असेल. तुमचा काही आक्षेप वा तक्रारी असतील, तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने त्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांशी जाऊन बोलायला हवं, की “मुख्यमंत्री महोदय पालघर घटनेप्रकरणी आम्हाला अमूक एक वाटतं आणि कारवाई नीट होत नाही.” शेवटी कोणताही गुन्हा सरकारच्या इशाऱ्यावर घडत नाही, असं संजय राऊत म्हणाले
दरम्यान, काल उत्तर प्रदेशमध्ये एकाला ठेचून मारलं, त्याला काय योगी आदित्यनाथ यांना विचारून मारलं की तिथल्या गृहमंत्र्यांना? गुन्हे घडतात, अशा गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवण्याचं काम सरकार करतं. सरकारनं २४ तासांमध्ये शंभरच्यावर आरोपींना अटक केली. एकही आरोपी सुटलेला नाही. ही सरकारची कारवाई आहे. हत्या साधूंची असो की सामान्य माणसाची, हे वाईटच आहे,” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्याचा व्हिडीओतून ‘पॉवरफूल’ संदेश
…तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार का?; निलेश राणेंचं अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र
सांगलीतील रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत- जयंत पाटील
सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत- नारायण राणे