मुंबई : कोरोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं जागतिक निविदा काढल्या. त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार निशाणा साधलाय.
महाविकास आघाडी सरकारच्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का? अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का? असा प्रश्नही त्यांनी केलाय. लस खरेदी प्रक्रिया नेमकी कशामुळे रखडली अडकली याचा राज्य तातडीने खुलासा करून सरकारने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा, असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”
भाजपने पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलंय, म्हणून ते अजून कोकणातही गेलेले नाहीत”
“मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या सन्मानाविषयी कोणीही भाजपला शिकवण्याची गरज नाही”