पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
गेल्या 3 महिन्यापासून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.
धनंजय मुंडे यांचा सत्कार करायला ते काय पराक्रमी योद्धा आहे का?, अशी टीका तृप्ती देसाई यांनी मुंडेंवर केली. तसेच धनंजय मुंडे यांचं जल्लोषात स्वागत आणि सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल. हे जर असंच सुरू राहिलं तर काही काळानंतर बलात्काराचे आरोप असलेला नेता आणि मंत्र्यांचे स्वागत करण्याचा चुकीचा पायंडा पडेल, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी-
“मला कोणी खलनायक ठरविलं तरी चालेल पण मी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणार नाही”
पक्ष वाढवायचा असेल तर…; जयंत पाटलांच कार्यकर्त्यांना आवाहन
धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मांची मुंबई पोलीस आयुक्तांकडेतक्रार
“…तर मग फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”