भाजप हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू ; जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

0
349

मुंबई : खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यावर भाजप हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे मात्र त्यात तथ्य नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे ते महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, नुसती आकडेवारी सादर करण्यापेक्षा आम्हाला साथ द्या. तसं झालं तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरणार नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये- जयंत पाटील

खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस

“त्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…”

सोनू सुद जर यूपीमध्ये असता तर योगी सरकारने…; यूपी काँग्रेसचा योगी सरकारवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here