मुंबई : राज्यात सध्या वीज बिल वसुलीचा मुद्द्यावरुन राजकारण चांगलाच तापताना दिसत आहे. ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने जाहीर केला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
“कोविड-१९ च्या काळात मद्य विक्रीसाठीच्या शुल्कामध्येही 50 टक्के सूट दिली, मग वीज ग्राहकांना सूट देण्यात राज्य सरकारला कोणती अडचण निर्माण झाली आहे? जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का? याचं उत्तर द्या किंवा जनतेची माफी मागून हा निर्णय मागे घ्या!” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
कोविड-१९च्या काळात मद्यविक्रीसाठीच्या शुल्कामध्येही 50टक्के सूट दिली,मग वीज ग्राहकांना सूट देण्यात राज्य सरकारला कोणती अडचण निर्माण झाली आहे?जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का?याचं उत्तर द्या किंवा जनतेची माफी मागून हा निर्णय मागे घ्या! @OfficeofUT @NitinRaut_INC @AjitPawarSpeaks pic.twitter.com/GjjJNEOcqe
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 30, 2021
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना सगळं बटण दाबून करते; नारायण राणेंची सेनेवर टीका
“मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप”
“धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या भावाला भर चाैकात गोळ्या घातल्या”