मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. त्याचा एक अहवाल त्यांनी वाचून दाखवला होता. तर हे पुरावे त्यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे दिले होते. तसेच हे पुरावे वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडून लीक झाल्याचं समोर आलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा अहवाल आपल्याकडं असल्याचं सर्वांना दाखवलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले होते. तसेच रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी कृत्यासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांनी याचा गैरवापर केला असा आरोप देखील त्यांच्यावर आहे.
दरम्यान, त्यानंतर आता या प्रकरणात रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने चाैकशीसाठी समन्स बजावलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीस नागपुरमध्ये ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”
“परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला; अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याचा आरोप
लसींच्या दराबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान गप्प का?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
“कर्नाटकात उद्यापासून 14 दिवसांचा लाॅकडाऊन”