jio, Vodafone-Idea, Airtel चा ग्राहकांना फटका; रिचार्ज दर वाढणार!

0
219

मुंबई : वोडाफोन आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफ चार्जमध्ये 50 टक्के वाढ करण्याचं जाहीर केलं आहे. तर जिओनेसुद्धा प्रीपेड शुल्कात वाढ करण्याच निर्णय घेतला असून 6 डिसेंबरपासून 40 टक्के दर वाढवण्याची घोषणा केली आहे.

आता टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयाने सर्वच रिचार्जचे दर 40 ते 50 टक्क्यांनी वाढणार आहेत. तसंच महिनाभर कनेक्शन सुरु ठेवण्यासाठी लागणाऱ्या 28 रुपयांच्या रिचार्जमध्येही वाढ करण्यात आली आहे. आता यापुढे महिन्याला किमान 49 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे.

एअरटेलनं प्रतिदिन 50 पैसे ते 2.85 रुपये इतकी दरवाढ केली आहे. यामध्ये आता त्यांनी डेटा आणि कॉलिंगच्या सुविधा देण्यात येतील. तसंच मर्यादित कॉल संपल्यानंतर प्रत्येक मिनिटाला 6 पैसे अधिक मोजावे लागतील असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

सर्वात स्वस्त सेवा पुरवणाऱ्या जिओनेही 40 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. नव्या प्लॅनमधून ग्राहकांना 300 टक्के जास्त लाभ देऊ असं जिओ कंपनीने दावा केला आहे.

वोडाफोन,आयडिया कंपनीने कॉलिंगमध्ये प्रतिमिनीट 6 पैसे दरवाढ केली आहे. यामुळे कंपनीचा 1699 रुपयांचा अनलिमिटेल वार्षिक प्लॅन 2 हजार 399 रुपये इतका होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीसांना ‘मी’ पणाचा दर्प नडला- शरद पवार

अजित पवार भाजप मध्ये जाण्याचं ‘हे’ होतं कारण.. शरद पवारांनी केला…

“बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊ”

भारतीय संंघाचा खेळाडू मनीष पांडे विवाहबंधनात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here