आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : 16 आक्टोबरला “प्रबोधनमधील प्रबोधनकार” हा ग्रंथ प्रकाशन सोहळा शासनातर्फे होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.
‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या ग्रंथ प्रकल्पाबद्दल सरकारचं अभिनंदन करतो, मात्र, या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्यांना बोलावले असते तर अधिक आनंद झाला असता. याच बरोबर प्रबोधनकारांच्या विचारांचा व्यासंग आणि वारसा असणारे राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाला बोलावून एक चांगला संदेश देता आला असता, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : भाजपने आमचा विश्वासघात केला या मतावर मी आजही ठाम- महादेव जानकर
ज्या ज्या वेळी राज ठाकरे यांच्याशी भेट होत असते त्या त्या वेळी प्रबोधनकारांचे ज्याज्वल्य विचार त्यांच्या तोंडून ऐकले आहेत. आताही वेळ गेलेली नाही. त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देता येईल. या व्यासपीठावर राज ठाकरे आले तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल, असंही आशिष शेलार म्हणाले.
दि.16 आक्टोबरला शासनातर्फे होणाऱ्या “प्रबोधनमधील प्रबोधनकार” या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रबोधनकारांच्या कुटुंबातील सदस्यांचा राजशिष्टाचार नुसार सन्मान करण्याबाबतची नम्र विनंती मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्राव्दारे केली! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/8JMDd1Xbqe
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडेंनी मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलंय; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
भाऊ म्हणून पंकजा मुंडेंच्या कायम पाठीशी उभा राहणार- महादेव जानकर
महापालिकेवर सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी शरद पवार पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर