मुंबई : सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे, असं राज ठाकरे म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
’जर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना 100 कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ही घटना लज्जास्पद आहे. अशी घटना महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासात घडली नाही. एक वर्षे झाले म्हणून 1200 कोटी द्यायला हवी असेल. पण लॉकडाऊनमुळे बार बंद होते. त्यामुळे ही वसुली झाली नसेल. राज्यात शहरं किती पोलीस कमिशनर किती त्यांना काय टार्गेट दिला हे अजून बाहेर आलं नाही. गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे,” असंंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धवजी, शरद पवार शिवसेना संपवण्याचं काम करत आहेत- चंद्रकांत पाटील
हे ठाकरे सरकार जनतेचा पैसा लुटण्यासाठी बनलं आहे- निलेश राणे
भारताचा इंग्लंडला ‘दणका’ सामना जिंकत मालिकाही घातली खिशात
राज्याचे पर्यटन आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण