Home महाराष्ट्र साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण करा-...

साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण करा- रोहित पवार

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांना पत्र लिहित मदतीचा हात मागितला. यावरून विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस प्रत्यृत्तर केलं आहे.

साहेबांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदीजींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं.त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल,असं मला वाटतं, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा, जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य- रोहित पवार

करोनाग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जेवणात घोटाळा- किरीट सोमय्या

…अन्यथा आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

… तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात; बाळासाहेब थोरातांच भाजपवर टीकास्त्र