महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या- चंद्रकांत पाटील

0
260

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

महाभकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कारभारात महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळालीच नाही. मात्र वर्षभरात या सरकामधील अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी आणि मुजोरपणा राज्यातील जनतेसमोर उघड झाला आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यावर त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले. आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर निर्णय घेऊ असं सांगत महाविकास आघाडीमधील जाणता राजाने त्या मंत्र्यांना आणि त्यांच्या कथिक कृत्यांना पाठीशी घातलं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळ वळण, पूजाच्या वडिलांनी सांगितलं आत्महत्येचे कारण; म्हणाले…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

पूजा चव्हाणला न्याय देण्याची धमक तुमच्यात नाहीच- अतुल भातखळकर

कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here