अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
भारताने एक डाव आणि 25 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली.
या विजया बरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होईल.
चौथ्या सामन्यात भारताचा पहिला डाव 365 धावांवर संपुष्टात आल्याने भारताने 160 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडला 54.5 षटकात 135 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून डॅनिएल लॉरेन्सने एकाकी झुंज दिली. त्याने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त जो रुटने 30 धावांची खेळी केली. बाकी कोणाला फारसे काही करता आले नाही.
India on
Virat Kohli and Co. are No.1 in the @MRFWorldwide ICC Test Team Rankings pic.twitter.com/uHG4q0pUlj
— ICC (@ICC) March 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं”
…नाहीतर काही लोक स्वत:साठी मागतात; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला
राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू, कुणालाच कुणाचा धाक उरला नाही- चंद्रकांत पाटील
अन् चांगला फटका मारल्यानंतरही सिब्लीला व्हावे लागले दुर्दैवीरित्या बाद; पहा व्हिडिओ