Home पुणे “कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन, सरकार महाराष्ट्राची फसवणूक करतंय”

“कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन, सरकार महाराष्ट्राची फसवणूक करतंय”

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन करून एक प्रकारे महाराष्ट्राची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुण्यातील भाजपच्या वर्धापन दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लॉकडाऊनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फसवणूक केल्याची टीका त्यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी विकेंड लॉकडाऊनबाबत चर्चा केली गेली मात्र पत्रक पूर्ण लॉकडाऊनचं काढलं गेलं, असा आरोप देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.

दरम्यान, भाजप आणि सर्वसामान्य जनता हे सहन करणार नाही असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात टाका; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

येत्या 8 दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?- रूपाली चाकणकर

“देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”