आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या घराच्या आवारात शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चप्पलफेक केली. याच पार्श्वभूमीवर आंदोलकांशी हात जोडून चर्चेच्या तयारीत असलेल्या सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया देताना सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्याचं म्हटलं आहे.
आज सिल्व्हर ओकवर जो हल्ला झाला, तो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये मतभेद जरूर होते, आहेत राहतील. पण मनभेद कधीच नव्हते. आपण एसटी कर्मचाऱ्यांचा विचार केला, तर गेली 50 वर्ष या सर्व एसटी कर्मचाऱ्यांचं जणूकाही नेतृत्वच एसटी कर्मचाऱ्यांनी केलं. एखाद्या चुकीच्या हातात राजकीय नेतृत्व गेलं, की त्याचे दुष्परिणाम काय होतात, हे आज दिसलंय, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांना पोलिसांकडून समन्स, उद्या चाैकशीसाठी हजर राहणार”
जेएनयूचं 77 साली आंदोलन झालं. तेव्हा निवेदन स्वीकारायला जेएनयूच्या गेटवर स्वत: इंदिरा गांधी गेल्या होत्या. आणि त्यांचे नेते सीताराम येचुरी होते. हा भारताचा इतिहास आहे. त्या विद्यार्थ्यांच्या समोर जाताना इंदिरा गांधी घाबरल्या नाहीत. आज त्याच इंदिरा गांधी मला सुप्रिया सुळेंच्या रुपाने दिसल्या. त्या घाबरल्या नाहीत एसटी कामगारांच्या समोर येताना. धक्काबुक्की झाली, पण त्या मागे हटल्या नाहीत. हात जोडून उभ्या होत्या. तुम्ही एका बाईला धक्काबुक्की करता? ज्या बाईच्या अंगात शरद पवारांचं रक्त आहे, ती घाबरणारी नाही”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, “आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहोत, पण चुकीची दिशा दाखवणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही”, असं म्हणत शरद पवारांनी देखील आंदोलनावर नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भोंग्यावरून राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुजात आंबेडकरांना मनसेचं जोरदार उत्तर, म्हणाले…
“किरीट सोमय्या देशद्रोही व्यक्ती, त्याची जागा फक्त तुरूंगातच”
“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती बांधलं घड्याळ”