टोक्यो : बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
पी. व्ही. सिंधूने आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पराभव केला. या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
दरम्यान, सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार”
“बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण…”
नागपुरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी
“राजकीय गांजाड्यांना शिवसेनेच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही”