डे-नाईट टेस्टमध्ये भारताची दमदार सुरुवात

0
190

कोलकाता : ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टमध्ये भारताची दमदार सुरुवात झाली आहे. टॉस जिंकून  बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली आहे. बांगलादेशचा डाव 82/7 असा झाला आहे. यामध्ये उमेश यादवने 3 तर इशांत शर्माने 3 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली आहे.

बांगलादेशचा ओपनर शदमन इस्लामने सर्वाधिक 29 रनची खेळी केली, तर लिटन दासने 24 रन्सची खेळी केली. बांगलादेशच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला खातंही उघडता आलं नाही. कर्णधार मोमीन उल हक, मोहम्मद मिथून आणि मुशफिकुर रहीम शून्य रनवर आऊट झाले.

भारत आणि बांगलादेश हे संघ पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट मॅच खेळत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये हा सामना सुरु आहे.

दरम्यान, डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे नेहमीच्या लाल बॉलऐवजी गुलाबी बॉलने ही मॅच खेळवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here