नवी दिल्ली : भारताची आघाडीची नेमबाजपटू मनू भाकर हिने ISSF शूटिंग वर्ल्ड कप फायनल्समधील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात सुवर्ण पदक पटकावले आहे.
मनूने 244.7 गुण मिळवून ज्युनिअर विश्व विक्रमाची नोंद करीत हे सुवर्ण पदक पटकावले आहे. तर सर्बियाची जोराना अरुनोविक (241.9) ने रौप्य पदक पटकावले आहे. तर चीनच्या क्वियान वांग (211.8) हिने कांस्य पदक पटकावले आहे.
17 वर्षीय मनू भाकर हिने ज्युनिअर विश्व विक्रमाची नोंद करीत सुवर्णपदक पटकावले आहे. यासोबतच ती आयएसएसएफ विश्व कपमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी हिना सिद्धूच्या नंतर पदक जिंकणारी दुसरी भारतीय नेमबाज बनली आहे.
दरम्यान, बुधवारी मनूला महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तूल गटात फायनलसाठी पात्रता मिळवता आली नव्हती.