सिडनी : आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आधीच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ फायनल दाखल झाला.
‘अ’ गटात टीम इंडियाला 8 गुणांसह पहिल्या स्थानावर असल्यामुळे त्याचा फायदा आज भारतीय संघाला झाला आहे.
ऑस्ट्रेलियातील सिडनीत सातत्याने पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. आयसीसीच्या नियमानुसार सकाळी 11 वाजता टॉस होणार होता. मात्र पावसाचा वेग पाहता, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामनाच रद्द करण्यात आला.
दरम्यान, फायनलमध्ये भारताचा सामना 8 मार्चला फायनलमध्ये भारताचा सामना 8 मार्चला दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या संघाशी होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवारांनी मला न्याय द्यावा; विद्या चव्हाण यांच्या सुनेची मागणी
ज्याचा स्वतःच्या आमदारांवर लगाम नाही, असा माणूस महाराष्ट्राचा आज मुख्यमंत्री- निलेश राणे
हे सरकार नक्की चालवतंय कोण?; भाजपचा शिवसेनेला सवाल
“आमच्या घरात माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे”