Home क्रीडा “भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”

“भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. पार्थिवने आपल्या ट्विटर हैंडलवरून याची माहिती दिली आहे.

गेल्या 18 वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात सुरु असलेला प्रवास मी आता थांबवत आहे. हे सांगतान माझे मन भरून आले आहे. त्याचवेळी मी अनेकांचा ऋणीही आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका 17 वर्षांच्या मुलाला भारतीय संघात स्थान देण्याचा विश्वास दाखवला. माझ्या कारकीर्दीत बीसीसीआयने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी आभारी आहे, असं पार्थिव पटेलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पार्थिव पटेलने 25 कसोटी सामने, 38 एकदिवसीय सामने तर 2 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं- प्रकाश जावडेकर

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे

मिशेल स्वीपसनची शानदार गोलंदाजी: ऑस्ट्रेलियाची भारतावर 12 धावांनी मात; भारताने मालिका जिंकली

प्रत्येक जातीची जणगणना व्हावी- रामदास आठवले