नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. भारतीय संघाचा या सामन्यात पराभव होणार असल्याचं चित्र होतं. मात्र फलंदाज हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी केलेल्या चिवट खेळीमुळे हा सामना अनिर्णीत राहिला. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार व गायक बाबुल सुप्रियो यांनी प्रतिक्रिया देत हनुमा विहारीवर टीका केली होती. यावर हनुमा विहारीनं प्रत्युत्तर दिलं आहे.
सुप्रियो यांनी हनुमा विहारीवर संथ खेळीवरुन टीका केली होती. या ट्विटमध्ये सुप्रिया यांच्याकडून हनुमाचं आडनाव लिहिताना चुक केली. सु्प्रिया यांनी विहारीऐवजी बिहारी लिहिलं. यावरुन विहारीने सुप्रियो यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. तसेच हनुमाने सुप्रिया यांच्या ट्विटखाली आपलं अचूक नाव लिहित प्रत्युतर दिलं. या प्रत्युतराचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे.
*Hanuma Vihari
— Hanuma vihari (@Hanumavihari) January 13, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“पोलिसांनी तातडीने सत्य बाहेर आणलं पाहिजे”
नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड
धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!