हैदराबाद : बांगलादेशला नमवल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज बरोबर लढण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन टी-20 मालिकेतील पहिला सामना आज हैदराबाद येथे होणार आहे.
एकीकडे टी-20 वर्ल्ड कप विजेते आणि दुसरीकडे टी-20 वर्ल्ड चॅम्पियन यांच्यात आज भिडत होणार आहे. भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विराट कोहली विश्रांतीनंतर या मालिकेत कमबॅक केलं आहे. या सामन्यात एकीकडे विराट कोहली तर दुसरीकडे कॅरन पोलार्ड यांच्यात मैदानावर लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यात बांगलादेशविरुद्ध विश्रांती घेतलेला विराट पुन्हा मैदानात दिसणार आहे.
दरम्यान, पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
#TeamIndia have won the toss and will bowl first #INDvWI @paytm pic.twitter.com/ezWEPCVzZb
— BCCI (@BCCI) December 6, 2019
महत्वाच्या घडामोडी –
मानवधिकार आयोग करणार हैदराबाद एन्काऊंटरची सखोल चौकशी
“उत्तर प्रदेश, दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवं”
हैदराबाद बलात्कार प्रकरण; “आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल”
हैदराबाद आरोपीं एन्काउंटरवर प्रकरणी ‘निर्भया’च्या आईची प्रतिक्रिया